लंडन मध्ये राज्याभिषेकावेळी झळकले ‘नॉट माय किंग’ पोस्टर
लंडन येथे किंग चार्ल्स तिसरा याचा नुकताच राज्याभिषेक सोहळा पार पडला आहे. या राज्याभिषेकाला लंडनमध्ये रिपब्लिक या संघटनेच्या लोकांनी विरोध केला. ‘नॉट माय किंग’ म्हणजे ‘हा माझा राजा नाही’, असे पोस्टर रिपब्लिकच्या सदस्यांनी हातात घेऊन विरोध दर्शवला होता. त्यानंतर पोलिसांनी 7 सदस्यांना अटक केली आहे. राज्याभिषेक झाल्यानंतर 7 तासांनंतरही अटक केलेल्यांची सुटका झाली नव्हती.