अल्पवयीन मुलीवर सात तरुणांचा सामूहिक बलात्कार
पाचोरा: शहरातील चौदा वर्षीय मुलीचा तरुणांनी विनयभंग करत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने पीडित मुलीला गर्भधारणा झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या वृद्ध आजीने पोलिसात तक्रार दिली. नंतर पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सुमीत कश्यप, संकेत साठे, आकाश वाघ, गणेश भोई, जतिन चनाडे, अतुल महाजन, योगेश पाटील अशी तरूणांची नावे आहेत.