‘महाराष्ट्र सोडा, साधी मुंबई बंद करून दाखवा’
उद्धव ठाकरे यांनी बारसूमधील लोकांना रिफायनरी नको असेल तर इथे रिफायनरी होता कामा नये. जर हुकूमशाहीने हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटवू, असे म्हटले होते. आता त्याला नितेश राणे यांनी उत्तर दिले आहे. महाराष्ट्र सोडा, साधी मुंबई बंद करून दाखवा. मुंबई जमत नसेल तर कलानगर बंद करून दाखवा, असे आव्हानच नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना दिले आहे.