‘आरोप सिद्ध झाले तर फाशी घेईन’ ब्रिजभूषण सिंग
रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांना अटक करावी या मागणीसाठी कुस्तीपटू दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन करत आहेत. त्यातच ब्रिजभूषण सिंग यांनी मोठे विधान केले. माझ्यावरील एकही आरोप सिद्ध झाला तर मी स्वतः फाशी घेईन तसेच पैलवान असलेल्या कोणत्याही मुलीला हे आरोप खरे आहेत का, विचारले पाहिजे. 12 वर्षांत मी एकाही मुलीला चुकीच्या पद्धतीने पाहिलेलं नाही, असे ते म्हणाले.