आयटीआय विद्यार्थ्यांना दरमहा मिळणार 500 रुपये
राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षापासून दरमहा 500 रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. अशी माहिती मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबईत दिली. तसेच विद्यार्थी, युवक-युवती आणि पालकांना करिअरविषयक विविध संधींची माहिती घरुन घेता यावी म्हणून कायमस्वरूपी हेल्पलाईन नंबर आणि ईमेल आयडी सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.