17 मे रोजी स्वाभिमानीचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर येत्या 17 मे रोजी द्राक्ष बागायतदारांच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. द्राक्षांना दर नाही, तर बेदाण्याचे विक्रमी उत्पादन झाल्याने त्याचे भाव घसरतील म्हणून द्राक्ष उत्पादकांना एकरी एक लाख तसेच बेदाणा उत्पादकांना प्रति टन एक लाख अनुदान द्या, अशी मागणी करण्यात आली आहे. यंदा बेदाणाचे 3 लाख टन उत्पादन झाल्याचे सांगितले जात आहे.