गणेश नाईकांविरोधातील बलात्काराची तक्रार मागे !!
भाजप नेते गणेश नाईक यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप असणारी तक्रार संबंधीत महिलेने मागे घेतली आहे. तसेच या महिलेने तक्रारीसाठी शिवसेनेकडून ऑफर आल्याचा आरोप केला. नाईकांसोबत 27 वर्षापासून असलेल्या प्रेमसंबंधातून झालेल्या मुलाला त्यांनी वडिलांचे नाव द्यावे अशी मागणी या महिलेची होती. पण नाईकांनी नकार दिल्याने या महिलेने त्यांच्याविरोधात नेरूळ पोलीसांत बलात्काराची तक्रार दिल्याचे सांगितले जात आहे.