‘चांगल्या पाहुण्यांसाठी मी चांगला यजमान.. ‘
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांना भारताच्या परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी तीव्र शब्दात फटकारले होते. यावरुन माध्यमावर सुरु असलेल्या चर्चांना जयशंकर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ‘बिलावल भुट्टो परराष्ट्र मंत्री म्हणून एससीओमध्ये आले होते. माझ्याकडे चांगला पाहुणे आला, तर मी त्याच्यासाठी चांगला यजमान असेल. तसेच त्यांना चांगली वागणूक देण्यात आली,’ असे जयशंकर म्हणाले.