अरे देवा !!! गुजरातमध्ये ५ वर्षात ४१,००० महिला बेपत्ता!!
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालातून गेल्या ५ वर्षात गुजरातमधून तब्बल ४१ हजाराहून अधिक महिला या बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. अहवालानुसार, गुजरातमध्ये २०१६ मध्ये ७१०५,२०१७ मध्ये ७७१२,२०१८ मध्ये ९२४६ आणि २०१९ मध्ये ९२६८ इतक्या मुली व महिला बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आले आहे. तर २०२० साली एकूण ८,२९०महिला बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे.