मल्लपुरम – आतापर्यंत 21 मृतदेह सापडले!!
केरळमधील मल्लपुरम येथे पर्यटकांची जहाज पाण्यात बुडाल्याने आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तानुर कोस्टजवळ हा अपघात झाला. घटनास्थळी शोधमोहीम सुरु आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. जहाजावर किती पर्यटक होते याबाबत माहिती समोर आलेली नाही. या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना 2 लाखांची मदत जाहीर केली आहे.