December 11, 2023
PC News24
आरोग्यसामाजिक

भोसरी येथे उभारणार ई-वेस्ट रिसायकलिंग, प्लॅस्टिक रिसायकलिंग कम हॅबी सेंटर,पिंपरी -चिंचवड शहराची गेल्या काही वर्षात आयटी हब अशी नवी ओळख तयार झाली आहे.

भोसरी येथे उभारणार ई-वेस्ट रिसायकलिंग, प्लॅस्टिक रिसायकलिंग कम हॅबी सेंटर,पिंपरी -चिंचवड शहराची गेल्या काही वर्षात आयटी हब अशी नवी ओळख तयार झाली आहे.

आयटी हब मानल्या जाणाऱ्या या शहरात ई-वेस्टचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. अनेक नागरिक ई-वेस्ट कचऱ्यामध्ये टाकून देतात. त्यावर उपाय म्हणून महापालिका ग्रीन स्केप आणि ई.सी.ए. यांच्या संयुक्त विद्यमाने ई-वेस्ट रिसायकलिंग, प्लॅस्टिक रिसायकलिंग कम हॅबी सेंटर भोसरी येथे उभारण्यात आले आहे. या दोन्ही संस्था शहरातील विविध भागात जाऊन ई वेस्ट संकलित करत आहेत. नागरिकांना ई वेस्टसाठी किलोनुसार पैसेही देण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

देशातील नामांकित आयटी पार्क पिंपरी-चिंचवड शहर परिसरात हिंजवडी, तळवडे विकसित झाले आहे. शहराची सद्यस्थितीत लोकसंख्या सुमारे 30 लाखांच्या आसपास आहे. लोकसंख्या वाढीनुसार ई वेस्टही सातत्याने वाढत आहे. ई वेस्टचा पुर्नवापर होत नसल्याने पर्यावरणाचा प्रश्नही गंभीर होत आहे. त्यामुळे महापालिका आणि शहरातील काही पर्यावरण प्रेमी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून ई वेस्ट संकलन मोहिम राबविण्यात येत आहे.

आयटी पार्क परिसरात अभियंत्यांकडे जास्त प्रमाणात ई-वेस्ट असण्याची शक्यता आहे. हिंजवडी आयटीतील अभियंते, वाकड, रावेत, पिंपळे-सौदागर, पिंपळे गुरव भागात वास्तव्यास आहेत. तर तळवडे आयटीतील अभियंते निगडी, प्राधिकरण, संभाजीनगर, चिंचवड भागात आहेत,या अशा भागात अभियंत्यांच्या सुट्टीच्या दिवशी म्हणजे शनिवार आणि रविवार ई-वेस्ट संकलनासाठी कॅम्प लावण्यात येणार असल्याचे रूपेश कदम यांनी सांगितले.
गेल्या पावणेदोन वर्षांत शहरातील विविध भागातून 3 हजार 962 किलो ई वेस्टचे संकलन करण्यात आले आहेत. ई वेस्ट संकलित करून महापालिकेला देण्यात यावे यासाठी एजन्सीची नेमणूक करण्यात आली. एप्रिलपासून ई वेस्टसाठी नागरिकांना मोबदला देण्यास सुरूवात केले आहे. त्यानुसार लॅपटॉप, फ्रिज, टिव्ही, वातानुकुलित यंत्राला 10 रूपये किलो तर इतर वेस्टसाठी 8 रूपये किलो दराने पैसे देण्यास सुरूवात केली आहे. नागरिकांना ई वेस्ट दिले की जागेवरच पैसे देण्यात येत आहेत. तसेच ई वेस्ट संकलित करून त्याची रियूज रिसायकल व शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे.

Related posts

शिवरायांची वाघनखं मायभूमीत परतणार

pcnews24

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत केले नवीन ITPO संकुल ‘भारत मंडपम’चे उद्घाटन; 2,700 कोटी रु.खर्चून विकसित केले कन्व्हेन्शन सेंटर.

pcnews24

तळेगाव:लेखक राजन खान यांच्या मुलाची आत्महत्या.

pcnews24

बनावट चावी द्वारे वाहनांची चोरी करणारे अट्टल चोरटे स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

pcnews24

मणिपूर:दंगलग्रस्तांचे सांत्वन करण्यासाठी राहुल छावण्यांना गांधींची भेट

pcnews24

महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप!!!

pcnews24

Leave a Comment