अमृतसरमधील सुवर्ण मंदिराजवळ बॉम्ब स्फोट
पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराजवळ बॉम्ब स्फोट झाला आहे.बॉम्ब स्क्वॉड व FSL टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. सुवर्ण मंदिर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या प्रकरणी तपास सुरु असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, असे अमृतसरच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने म्हटले आहे.
सुवर्ण मंदिराजवळील हेरिटेज स्ट्रीटमध्ये शनिवारी मध्यरात्री झालेल्या स्फोटात सहा जण जखमी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, हा दहशतवादी हल्ला नसून अपघात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
स्फोटाच्या प्रभावामुळे जवळपासच्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचा उडाल्याने या जखमा झाल्या आहेत. अमृतसरचे पोलीस आयुक्त नौनिहाल सिंग यांनी ट्विट केले: “घटनेचे तथ्य प्रस्थापित करण्यासाठी तपास सुरू आहे आणि घाबरण्याची गरज नाही. नागरिकांना शांतता आणि सौहार्द राखण्याचे आवाहन करा, शेअर करण्यापूर्वी सर्वांना तथ्य तपासण्याचा सल्ला द्या.