‘मविआच्या सरकारमध्ये मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडल्या’
राज्यात बदल्यांचे रेट ठरल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केला होता. त्यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी प्रत्युत्तर देत त्यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. “महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रालयात हजारो दारूच्या बाटल्या सापडल्या. ते कितीदा बसायचे. हे मंत्रालयाचे काम आहे का? आताचे मंत्री मंत्रालयात बसत नसून फिरत असतात,” असे त्यांनी म्हटले आहे. ते गोंदियात बोलत होते.