‘पश्चिम बंगाल सरकारविरोधात कायदेशीर लढा देऊ’
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावर बंदी घातली. आता यावर चित्रपटाचे निर्माते विपुल शाह यांनी भाष्य केले. ममता बॅनर्जी यांनी असा निर्णय घेतला असेल तर आम्ही कायदेशीर कारवाई करु. कायद्याच्या तरतुदीनुसार जे शक्य असेल ते आम्ही करु, असे त्यांनी म्हटले आहे. तामिळनाडूतही या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.