पिंपरी चौकात अशोकस्तंभ उभारण्याची मागणी
पिंपरी चिंचवड : अशोकस्तंभ हे देशाचे राष्ट्रीय प्रतीक आहे. भारतरत्न डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर यांनी अशोकस्तंभ है भारताचे राष्ट्रीय प्रतीक बनवण्यासाठी प्रयत्न करून ते मंजूर करून घेतले. यामुळे डॉ.बाबाबासाहेब आंबेडकर स्मारका समोरील पिंपरी चौक येथे अशोक स्तंभ बसवण्यात यावा अशी मागणी एम आय एम आय एम चे शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, भारतरत्न डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर पिंपरी चौक हे पिंपरी -चिंचवड शहराचे मध्यवर्ती व मुख्य ठिकाण आहे. या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भीमसृष्टी स्मारक देखील आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील महत्वाचे कार्यक्रम या ठिकाणीच होत असतात. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. अशोकस्तंभ या ठिकाणी बसवल्यास शहराच्या लौकिकात भर पडणार आहे. शहरवासीयांसाठी हे आकर्षणाचे केंद्र बनणार आहे.