December 12, 2023
PC News24
गुन्हा

बेकायदेशीर गॅस cylinder रिफिलिंग करणाऱ्यावर पोलिसांची धडक कारवाई.

बेकायदेशीर गॅस cylinder रिफिलिंग करणाऱ्यावर पोलिसांची धडक कारवाई

पिंपरी-चिंचवड : मानवी वस्तीत बेकायदेशीररित्या व धोकादायक पद्धतीने गॅस रिफिलिंग करणाऱ्या तिघांना अटक केली. दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये दीड लाख रुपये किमतीचे 72 सिलेंडर जप्त केले आहेत.गुन्हे शाखेच्या (Pimpri) युनिट दोनने या दोन्ही कारवाया केल्या.

पहिल्या कारवाईमध्ये वाकड परिसरात बेकायदेशीरपणे गॅस सिलेंडर मधून गॅस धोकादायकपणे काढून घेतला जात असल्याची माहित मिळाल्यानंतर पोलिसांनी विष्णू ज्योतीराम सुतार (वय 24, रा. थेरगाव, पुणे. मूळ रा. लातूर), अतुल श्रीहरी पांचाळ (वय 25, रा. थेरगाव, पुणे. मूळ रा. लातूर) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 78 हजार 700 रुपये किमतीचे गॅस सिलेंडर आणि इतर साहित्य जप्त केले.

दुसरी कारवाई देखील वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत थेरगाव येथे करण्यात आली. त्यामध्ये पोलिसांनी जयराम सर्जेराव चौधरी (वय 22, रा. नेरे दत्तवाडी, ता. मुळशी, पुणे. मूळ रा. परभणी) याला अटक केली. त्याच्याकडून 71 हजार 525 रुपये किमतीचे गॅस सिलेंडर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

दोन्ही कारवायांमध्ये एक लाख 50 हजार 225 रुपये किमतीचे 43 घरगुती वापराचे विविध कंपनीचे सिलेंडर, 3 व्यवसायिक वापराचे सिलेंडर, 26 लहान चार कीलोचे सिलेंडर असे 72 विविध कंपनीचे सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, (Pimpri) सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उप निरीक्षक गणेश माने, पोलीस अंमलदार देवा राऊत, जयवंत राऊत, संतोष इंगळे, सागर अवसरे यांनी केली आहे.

Related posts

दौंड: पत्नी व दोन मुलांचा खून करून डॉक्टरची आत्महत्या

pcnews24

तळेगांव: आणखी दोन टोळ्यांवर मोका, रामा पाटील व कीटक भालेराव यांचा समावेश, पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई

pcnews24

हिंजवडी:सायबर गुन्हा: दाम्पत्याच्या बँक खात्यातून तब्बल चार लाख 78 हजार रुपये गायब

pcnews24

पुण्यात घातपाताची शक्यता?एनआयए,आणि एटीएस सतर्क.

pcnews24

अनैतिक संबधातून मित्राचा निर्घृण खून-मुळशी धरणात टाकला मृतदेह.

pcnews24

पुणे: मोटर परिवहन विभागातील (पुणे) पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या.

pcnews24

Leave a Comment