माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक (व्हिडिओ सह)
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे प्रमुख इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या बाहेरून रेंजर्सनी अटक केली आहे, असे पाकिस्तानच्या डॉन न्यूजने वृत्त दिले आहे. इम्रान खान हे एक प्रकरणाच्या सुनावणीसाठी इस्लामाबाद उच्च न्यायालयात गेला. सुनावणी संपल्यानंतर जेव्हा ते बाहेर निघाले त्यावेळी येथे त्यांना पाकिस्तानी रेंजर्सनी अटक केली. त्यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे.