आयटी बिझनेस हबमधील २,००० कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश
विमाननगर परिसरातील आयटी बिझनेस हबच्या बेसमेंट मधील इलेक्ट्रिकल रूममध्ये मंगळवार दुपारी आग लागली.
विमाननगर भागातील आयटी बिझनेस हबच्या एका मजल्यावरून प्रचंड धूर निघत असल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.अग्निशमन दलाने तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले.कर्मचाऱ्यांनी पाण्याचा फवारा मारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आयटी बिझनेस हबमधील २,००० कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याने अनर्थ टळला.अर्ध्या तासात आग आटोक्यात आणण्यात आली.