December 11, 2023
PC News24
गुन्हाठळक बातम्या

महाराष्ट्र एलएसएने दूरसंचार विभागा कडून21 हजार 31 बनावट सीमकार्डस रद्द

महाराष्ट्र एलएसएने दूरसंचार विभागा कडून21 हजार 31 बनावट सीमकार्डस रद्द
बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवलेले फोनचे सीमकार्डस सायबर गुन्ह्यांसाठी वापरले जातात, हे तर उघड सत्य असले तरी महाराष्ट्र एलएसएने दूरसंचार विभागाच्या ग्राहक डेटाबेसचे विश्लेषण करत बनावट कागदपत्रांच्या आधारे जारी केल्याचा संशय असलेले एकूण 21 हजार 31 सिम ओळखून ती रद्द केली आहेत.
या गैरव्यवहारात बनावट सीमकार्डस तयार करणारे लोक आता इतके सरावले आहेत,की त्यांनी अशा प्रकारची बनावट ओळखपत्रे / पत्ते दाखवणारी कागदपत्रे तयार केली आहेत, जी एकेक प्रकरणापुरता तपास करताना मानवी तपास पद्धतीत कधीही पकडली जाणार नाहीत. हे लक्षात घेऊन, दूरसंचार विभागाने, अशा कागदपत्रांच्या आधारे होणारे सायबर गुन्हे रोखण्याचे आव्हान हाती घेतले आहे. अभिनव आणि स्वदेशी कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान, ह्या संकल्पनेचा वापर करत त्या आधारावर, चेहऱ्याची ओळख पटवणाऱ्या फेशियल रेकग्निशन पॉवर्ड सोल्यूशन ( ASTR) ह्या अत्याधुनिक संसाधनांच्या मदतीने बनावट सिम कार्डस शोधून काढली आहेत.आणि विश्वासार्ह नसलेले मोबाईल क्रमांक ओळखून त्यातून ते वजा करण्याचे काम केले गेले. (Maharashtra) या सिस्टिममध्ये दूरसंचार कंपन्यांनी, दूरसंचार विभागाला दिलेल्या ग्राहकांचा डेटाबेस वापरून, एकच चेहरा आणि त्याचे वेगवेगळे क्रमांक ओळखले जातात.याच प्रणालीचा वापर करत, महाराष्ट्र एलएसएने दूरसंचार विभागाच्या ग्राहक डेटाबेसचे विश्लेषण केले आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे जारी केल्याचा संशय असलेले एकूण 21031 सिम ओळखून ती रद्द केली गेली.

अशा फसव्या/बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभागी असलेल्या दोषी लोकांवर आणि सिम विक्रेत्यांवर
लोकांवर आणि सिम विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. अशा PoS/सिम विक्रेत्यांना सेवा प्रदात्यांद्वारे (Maharashtra) आणि संपूर्णपणे काळ्या यादीत टाकले जात आहे. पुढील तपास करून दोषींवर आवश्यक कारवाई करण्यासाठी पोलिसांत तक्रार करण्यात येत आहे.

Related posts

पुढील 15 दिवसांत ‘हे ‘ सरकार कोसळणार,संजय राऊतांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ ….

pcnews24

पुण्याच्या बाणेरमधे दाजीची मेव्हण्याकडून हत्या.

pcnews24

हिंजवडीत लग्नाचे आमिष दाखवून अत्याचाराची घटना.

pcnews24

अकोला:नाव आणि धर्म लपवून सैय्यद ने तरुणीवर केले अत्याचार

pcnews24

नितीन देसाई आत्महत्याप्रकरणी त्यांच्या पत्नीची रायगड पोलिसात तक्रार.

pcnews24

दिघी :महिलेच्या पर्समधून पीएमपी बस प्रवासात 59 हजाराची रोकड लंपास

pcnews24

Leave a Comment