गिरीश बापट यांचे चिरंजीव गौरव बापट यांना लोकसभा पोटनिवडणूक उमेदवारी?
पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिवंगत गिरीश बापट यांच्या घरी भेट दिल्याने पोटनिवडणुकीच्या चर्चेला आता सुरुवात झाली आहे. गिरीश बापट यांचे चिरंजीव गौरव बापट यांची भेट घेतल्याने भाजपकडून उमेदवारी त्यांना दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, भाजपकडून अधिकृतरित्या भूमिका स्पष्ट झालेली नाही.
कसबा पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या जागी त्यांच्या कुटुंबाबाहेर भाजपने उमेदवारी दिल्याने भाजप सहानुभूतीच्या मतांना मुकल्याने गौरव बापट यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.