श्री गुरुदेव दत्त
आज बुधवार दिनांक 10 मे 2023
मिती वैशाख मासे कृष्ण पक्षे 5 शालिवाहन शके 1945 शोभन नाम सवंत्सरे
आजची ग्रह स्थिती
चंद्र धनु राशीत
रवि बुध गुरु राहू हर्षल – मेष राशीत
शुक्र व मंगळ मिथुनेत केतू तुळेत
शनि कुंभ राशीत या सर्व ग्रहांचा विचार करून आपण आजचे भविष्य जाणून घेऊ या
मेष रास
राशीस्वामी आज कर्क राशीत जाईल त्यामुळे आरोग्याची समस्या येऊ शकते आजचा दिवस कंटाळवाणा जाईल
भाग्य 68%
वृषभ रास
ओळखीचा फायदा होईल धनलाभ राहील ऑफिस मध्ये अडथळ्यातून कामे होतील
भाग्य 56%
मिथुन रास
छान ग्रहमान आहेत असे क्षण संपूच नये असे वाटेल पण उद्यापासून मंगळाचा त्रास सुरु होईल कामाचे स्वरूप बदलेल
भाग्य 87%
कर्क रास
चांगल्या गोष्टीसाठी खर्च वाढेल वस्तू सांभाळा कोणावर विश्वास ठेवू नका
भाग्य 56%
सिंह रास
मनासारखे घडत राहील मनोरंजनासाठी वेळ द्याल वेळेचे योग्य नियोजन कराल
भाग्य 76%
कन्या रास
विदार्थ्यांसाठी चांगला दिवस आहे तरुणांना योग्य जोडीदार भेटतील
मिष्टांन भोजन मिळेल
भाग्य 79%
तूळ रास
तुमचा महत्वाचा कामासाठी प्रवास होईल व काम साध्य होईल तरुणांना योग्य स्थळ येईल स्पर्धा परीक्षेत यश मिळेल
भाग्य 64%
वृश्चिक रास
पैशात वाढ होईल कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक राहील
मुलं खूष असतील
भाग्य 62%
धनु रास
आज दिवस आनंदात जाईल रात्रीपासून मूळव्याध पित्ताचा त्रासाची शक्यता
भाग्य 68%
मकर रास
प्रवास टाळण्याचा प्रयत्न कराल डावा पायाला दुखापत होऊ शकते
अपेक्षित बातमी मिळेल
भाग्य 58%
कुंभ रास
मोठया व्यक्तीच्या भेटी होतील लाभदायक दिवस राहील भावाकडून तुमचे कौतुक होईल
भाग्य 69%
मीन रास
कार्यक्षेत्रात भरीव काम कराल जोडीदाराची साथ उत्तम आहेच पण दोघे एकदम भावुक व्हाल व पंचांवार्षिक योजना आखाल
भाग्य 87%
श्री शरद कुलकर्णी (ज्योतिष अलंकार )
चिंचवड 9689743507