September 26, 2023
PC News24
गुन्हा

एटीएसच्या तपास अहवालातून धक्कादायक माहिती समोर…शास्त्रज्ञ कुरुलकर ISIच्या संपर्कात..!

एटीएसच्या तपास अहवालातून धक्कादायक माहिती समोर…शास्त्रज्ञ कुरुलकर ISIच्या संपर्कात..!

पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या डीआरडीओचे संचालक आणि शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना अटक झाल्यानंतर ATSच्या तपासात अनेक खळबळजनक खुलासे समोर आले.त्यांच्या कोठडीची मुदत मंगळवारी संपणार आहे. कुरुलकर याला आज एटीएसच्या पथकाकडून न्यायालयात हजर करण्यात आले होते. प्रदीप कुरुलकर हे ई-मेल मार्फत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात होते, असं एटीएसच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

एटीएसने प्रदीप कुरुलकर यांचे जप्त केलेले मोबाईल, लॅपटॉप आणि इतर तांत्रिक साहित्य फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे तपासणीसाठी पाठवले होते. त्यातुन ही बाब समोर आली आहे.
प्रदीप कुरुलकर हे डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमधे अनेक महिलांना भेटत होते. त्याचाही तपास करण्याची गरज असल्याचे एटीएसने न्यायालयात सांगितलं. प्रदीप कुरुलकर यांच्या बॅक अकाउंटमधे बाहेरच्या देशातून काही पैसै आले का? याचाही तपास करण्यात येणार आहे. तसेच प्रदीप कुरुलकर यांनी सरकारी पासपोर्टचा उपयोग करुन पाच ते सहा देशांना भेटी दिल्याचं एटीएसला आढळलं आहे.

संरक्षण संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर हे पुणे येथील त्यांच्या कार्यालयामधून पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (PIO) चे हस्तक यांच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉटअपद्वारे व्हाईस मेसेज, व्हिडिओ कॉलने संपर्कात राहिले असल्याची माहिती एटीएसलाला मिळाली होती. त्यासोबतच डीआरडीओच्या शास्त्रज्ञ पदाचा गैरवापर करत त्यांच्या ताब्यात असलेली संवेदनशील शासकीय माहिती ते पाकिस्तानला पुरवत असायचे.
एटीएसच्या तपास अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
प्राथमिक अंदाजानुसार हनी ट्रॅपमध्ये सापडल्याने ते पाकिस्तानला माहिती देत असल्याचा संशय आहे.

Related posts

मोरेवस्ती, चिखली: व्यावसायिकाने हप्ता देण्यास नकार दिल्याने दुकानाची तोडफोड

pcnews24

कंपनीमधील ॲल्युमिनियम साहित्याची चोरी …

pcnews24

मी आत्महत्या करतोय, माझा शोध घेऊ नका’ नक्की काय प्रकार आहे ?

pcnews24

‘३० मुलींनाचे अपहरण करून हत्या करणाऱ्या त्या’ आरोपीला जन्मठेपेची शिक्षा.

pcnews24

शहरातील पाच मोठ्या मॉलला नोटीसा.

pcnews24

ठाणे, मुंबई परिसरात वाढत्या मोटार सायकल चोरी प्रकरण उघड,त्रिकुटास मुंब्रा पोलीसांकडून अटक.

pcnews24

Leave a Comment