जितेंद्र आव्हाडांवर अदखलपात्र गुन्हा दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंद झाला आहे. ठाण्यातील वर्तक नगर पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. द केरला स्टोरी हा चित्रपट बनवणाऱ्याला सार्वजनिकरित्या फासावर लटकवले पाहीजे, असे विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. द केरळ स्टोरी हा चित्रपट खोटारडेपणाचा परमोच्च आहे, असेही आव्हाड म्हणाले होते.