पंजाब (पाकिस्तान) प्रांतात लष्करी राजवट लागू
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक केली आहे. त्यानंतर संपूर्ण देशात त्यांच्या समर्थकांनी जाळपोळ, दगडफेक आणि प्रचंड हिंसाचार केला. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आर्मी लॉ लागू केला आहे. आता येथे लष्कर तैनात करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात कलम 245 अंतर्गत लष्करी राजवट लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत पंजाब प्रांतातील सर्व निर्णय लष्कर घेईल.