विवाहितेला 150 उठाबशा काढण्याची अजब शिक्षा
विवाहितेचा शारीरीक व मानसीक छळ करत तिला शिक्षा म्हणून कधी 150 उठाबशा काढायला लावल्या तर कधीगळा दाबून तिला जीवेमारण्याचा अजब प्रकार 9 मे रोजी देहुरोड येथे घडला.
लग्न झाल्यापासून छोट्या-छोट्या कारणावरून या विवाहित पीडितेला सतत शारिरीक व मानसिक त्रास देत होते. यात कमरेच्या बेल्टने मारहाण केली. तसेच 150 उठाबशा काढायला लावल्या तसेच गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
यावरून देहुरोड पोलीस ठाण्यात आरोपी
विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, जावेद मुबारक मुल्ला, मुबारक मुल्ला, मोसीन मुबारक मुल्ला, दोन महिला आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला असून देहोरोड क्राईम पोलीस पुढील
(DEHUROAD CRIME) तपास करत आहेत.