सुन, मुलगी आणि नातीच्या वजनाची पुस्तके केली दान
सोलापुरातील अक्कलकोट येथील सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक स्वामीनाथ हरवाळकर यांनी संकलित केलेले सुमारे दीड क्विंटल वजनाची पुस्तके श्रीमंत शहाजीराजे भोसले वाचनालयाला भेट केली आहेत. आपल्या मुलाच्या लग्नात सुन, मुलगी आणि नात यांच्या वजनाइतकी ही सर्व पुस्तके त्यांनी भेट म्हणून दान दिले. हे अजरामर साहित्य मी गोळा केलेला आहे. ते पुढच्या पिढीला वाचता यावे, असे हरवाळकर म्हणाले.