December 12, 2023
PC News24
राजकारण

NCP प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना ED चे समन्स.

NCP प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना ED चे समन्स

NCP प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आयएल आणि एफएलएस प्रकरणी ईडीची नोटीस आली आहे. आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून अनेकांनी आर्थिक मोठा गैरव्यवहार केला गेला असल्याचा आरोप होता. जयंत पाटील यांना सोमवारी हजर राहण्याचं समन्स देण्यात आलं आहे.

आयएलएफस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील चौकशीचा एक भाग म्हणून जयंत पाटील यांना ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे. आयएल आणि एफएलएसच्या च्या माध्यमातून अनेक बड्या लोकांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. यापूर्वी या प्रकरणात मनसेप्रमुख राज ठाकरे यांचीही ईडीने चौकशी केली होती. त्यानंतर आता जयंत पाटील यांना ईडीने चौकशीसाठी पाचारण केले आहे. या प्रकरणात सर्वप्रथम दिल्लीतील आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर या आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती पाहता हे प्रकरण सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडे सोपवण्यात आले होते. येत्या सोमवारी जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी होणार आहे. मात्र, आता या नोटीसवर जयंत पाटील हजर राहतात की काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

Related posts

मग उद्धव ठाकरेंना अटक होणार का ?

pcnews24

भाग १-भाजप आमदार उमा खापरे राज्य पातळी वरील प्रश्‍न मांडण्यात यशस्वी…शहरातील आमदारांचा लक्षवेधीवर ‘लक्ष्यवेध’.

pcnews24

चिंता करू नका, ग्राहकांना भुर्दंड नाही; UPI पेमेंटशी निगडीत ‘या’ गोष्टी समजून घ्या

Admin

चंद्रशेखर बावनकुळे- भाजपकडून प्रदेश कार्यकारणीत फेरबदल होणार.

pcnews24

सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट, राष्ट्रीवादीचेच दोन गट आहे…

pcnews24

योगी-शिंदे यांची भेट

pcnews24

Leave a Comment