‘थिएटर वर्कशॉप कंपनी’संस्थेत रंगणार प्रायोगिक नाट्यकलांचा महोत्सव’
पिंपरी-चिंचवड शहराची उद्योग नगरी म्हणून असलेली ओळख हळूहळू बदलते आहे.या शहराच्या सांस्कृतिक,सामाजिक,
शैक्षणिक क्षेत्रातील प्रगती उल्लेखनीय आहे.
सांस्कृतिक जडणघडणीत अग्रगण्य असलेल्या
‘थिएटर वर्कशॉप कंपनी’ तर्फे प्रायोगिक नाट्यकलांचा महोत्सव सादर होणार आहे.
संस्थेच्या वतीने रंगानुभूतिः पुर्वरंग ते उत्तररंग या नावाने संस्थेच्या पैस रंगमंच, चिंचवड येथे होणार आहे.
महोत्सव शुक्र.दि.१२ मे ते रवि.दि.१४ मे २०२३ या कालावधीत सायं.४ ते ८ या वेळात आयोजित केला आहे. महाराष्ट्र,केरळ आणि गोव्यातील नामवंत संस्थांची निमंत्रित नाटके या महोत्सवात सादर केली जाणार आहेत. परिसरातील स्थानिक कलावंत ते राज्यासह राष्ट्रीय पातळीवरील कलावंतांच्या कलांचा अंतर्भाव करुन तो रसिक श्रोत्यांना उपलब्ध करुन देणे हाच एक उद्देश समोर ठेवून महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संपुर्ण महोत्सवासाठी प्रवेशिका नोंदणी आवश्यक असून संपुर्ण नाट्य प्रयोगकला महोत्सवाच्या प्रवेशिका मर्यादितच आहेत. प्रवेश नोंदवू इच्छिणाऱ्यांसीठी स्वतंत्र ओळखपत्र आणि नाट्य प्रयोगकला महोत्सवाची पुस्तिका सोबत दिली जाईल. शिवाय महोत्सवासाठी त्यांची राखीव आसन व्यवस्था असेल.
संस्थेच्या वतीने या महोत्सवा विषयीची काही वैशिट्ये सांगण्यात आली आहेत.हा महोत्सव तीन दिवसीय असून महाराष्ट्र,गोवा आणि केरळ मधील मिळून ५ नाटके अनुक्रमे मराठी, हिंदी आणि मल्याळम भाषांमध्ये त्यांचे सादरीकरण अनुभवता येईल.तसेच नामवंत मान्यवरांचे नाट्य लेखन आणि नाट्य दिग्दर्शनांवर आधारीत विशेष अभ्यासवर्ग,चर्चासत्रे या महोत्सवा दरम्यान असणार आहे.
नाट्य प्रयोगांसाठीचे प्रत्येक दिवसाचे प्रवेश शुल्क रु.२००/- असून प्रत्येक दिवसाच्या प्रवेशिका पैस रंगमंच चिंचवड येथेच मिळतील.
संपुर्ण महोत्सवासाठी खालील प्रवेशिका नाेंदणी अर्ज आवश्यक आहे. रु.५००/- मध्ये संपुर्ण महोत्सव चहापानाच्या व्यवस्थेसह अनुभवता येणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील जास्तीत जास्त कलावंत,श्रोते,रसिक,
अभ्यासकांनी या महोत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन करण्यात आले.यामहोत्सवाच्या आधिक माहितीसाठी खालील फोन नंबर वर संपर्क साधावा.
प्रभाकर पवार – ८६६९२२०६१२,
अमृता ओंबळे – ९९७५४०४०२६ , युसूफअली शेख – ९१७२३३३२४८.
प्रवेशशुल्क जमा केल्याचा स्क्रिनशॉट थेट ८६६९२२०६१२ किंवा ९९७५४०४०२६ या नंबरवर whatsapp केल्या नंतर महोत्सवाच्या १ दिवस आधी किंवा महोत्सवाच्या दिवशी पैस रंगमंच येथून तुम्हाला तुमचे ओळखपत्र आणि प्रवेशिका स्विकारता येतील.
सदर लिंक माध्यमातून आपण आपली नोंदणी नोंदवू शकता.