पुण्याचा पारा उद्या जाणार ४१°च्या पुढे
पुणे : आज उष्णतेने 41 अंश तापमानाचा सर्वोच्च उच्चांक गाठला आहे. तर दिवसभर पुण्यात ऊन आणि वारे असा प्रवास चालू होता.
यंदाच्या उन्हाळ्यातला आज सर्वोच्च तापमान असल्याचे म्हंटले जात आहे. तर उद्या 0.5 अंशाने वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मे महिन्यात उष्मा वाढला असून नागरिकांच्या अंगाची अक्षरक्ष: लाही लाही होऊ लागली आहे. तसेच आज मे महिन्याच्या अकराव्या दिवशी तापमानाने गाठलेल्या सर्वोच्च अंकाने बाकीचे दिवस कसे जाणार? याची चिंता वाढली आहे. तर IMD-GFS च्या ताज्या अंदाजानुसार 14 मे पासून तापमान 40 अंशांच्या (Pune) खाली येणार आहे. परंतु, वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळी शक्यतो कारणास्तव बाहेर पडू नये. बाहेर पडताना शक्य तितकी काळजी घ्यावी, व उष्माघातापासून स्वत:चा बचाव करावा.Reserch scientist विनीत कुमार (@vineet_tropmet) यांनी देखील ट्विट करून ही माहिती दिली आहे.