केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री.नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारणार ई महामार्ग
लांब पल्ल्याच्या प्रवासाला जाताना कमी वेळात Expressways सुखकर ठरत असेल तरी अनेकदा यावरून प्रवास करताना लागणारे एकूण इंधन, जागोजागी भरावा लागणारा टोल यांचाच आपण आधी हिशेब मांडतो पण आणि मगच त्या प्रवासाला निघतो. कारण लांबच्या प्रवासात खर्च होणारे इंधन त्याची वाढलेली किंमत हि बाब नेहमीच चिंतेचा विषय ठरत आली आहे. पण आता यासाठी केंद्र सरकार एक इलेकट्रीक हायवे निर्माण करण्याच्या तयारीत आहे.ज्यावर धावणाऱ्या गाड्या ह्या कुठल्याही प्रकारच्या इंधनाशिवाय धावणार आहेत.
भारताचे विद्यमान केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री माननीय श्री.नितीन गडकरी ह्यांनी एका कार्यक्रमात भारत आता इलेक्ट्रिक हायवे तयार करणार असल्याचे सांगितले होते. दिल्ली ते मुंबई ह्या देशाच्या आर्थिक व प्रमुख राजधानी दरम्यान एक ई हायवे तयार करण्यात येईल. ज्या हायवेवर ओव्हर हेड वायर चे जाळे पसरवण्यात येईल मग त्या ओव्हर हेड वायरमध्ये विदुयत पुरवठा कार्यान्वित करून तयार होणाऱ्या विजेच्या आधारे ह्या मार्गावर गाड्या धावणार असल्याची माहिती श्री. गडकरी यांनी दिली होती . नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारला जाणारा हा ई महामार्ग चारपदरी असेल आणि मुख्य म्हणजे भारतात हा प्रकल्प यशस्वी झाल्यास हा जगातील सर्वात लांब ई-हायवे ठरेल.
‘ई महामार्ग’ संकल्पना राबवताना रुळांवरून धावणाऱ्या रेल्वे गाडयांना ओव्हर हेड वायरच्या साहाय्याने पुरवण्यात येणाऱ्या विजेप्रमाणेच ह्या ई हायवे वर जमीन किंवा आकाशाच्या दिशेला असलेल्या विजेच्या तारांच्या मदतीने ट्रेनच्या वरच्या बाजूने असलेल्या पेंटाग्राफच्या सहायाने वीज इंजिना पर्यंत पोहचवली जाऊन तिचे ऊर्जेत रुपांतर होईल आणि त्या द्वारे ट्रॉली ट्रक,ट्रॉली बस धावण्यात येतील.इलेक्ट्रिक हायवेमुळे मालवाहतूकीवरील खर्च कमी होईल.चार्जिंग स्टेशनवरही वाहनांना ताटकळत राहण्याची गरज उरणार नाही. महत्वाचे म्हणजे या कामासाठी लागणारी वीज ही सौर ऊर्जेच्या साह्य्याने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने सध्या होणारे विजेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर आवाक्यात येईल.