निगडी ते दापोडी द्रुतगती मार्गाचा नव्याने विकास करण्याची योजना
पिंपरी चिंचवड : महापालिकेच्या वतीने पिंपरी चिंचवड येथील निगडी ते दापोडी या द्रुतगती मार्गाचा नव्याने विकास करण्यात येणार आहे. महापालिकेच्या वतीने अत्यानुधिक तंत्रज्ञानाच्या आधारे व नागरिकांच्या सूचना लक्षात घेवून रस्त्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी १२.०५.२३ रोजी दुपारी ३ वाजता बैठकीचे आयोजन केले आहे. नागरिकांनी बैठकीस उपस्थित राहून सूचना देण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड सारथी च्या ट्विटर अकाऊंट वरून करण्यात आले आहे.
*काय आहे ट्विट*
“#दापोडी ते #निगडी रस्त्याचा विकास, सुखकर करेल आपला प्रवास!दापोडी ते निगडी द्रुतगती मार्गाच्या विकसनासंदर्भात आपल्या सूचना जाणून घेण्यासाठी उद्या १२/०५/२०२३ दुपारी ३.००वा. बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.ही बैठक कै. मधुकरराव पवळे सभागृह, ३रा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका , मुंबई पुणे महामार्ग, पिंपरी पुणे -१८ येथे होणार आहे.