लिंडा याकोरिनो ट्विटरच्या नवीन CEO ?
ट्विटरच्या CEOपदाचा राजीनामा देण्याची घोषणा इलॉन मस्क यांनी केली आहे. त्यानंतर आता या पदावर कुणाची वर्णी लागणार, यासंदर्भात चर्चा सुरु झाली आहे. एनबीसी युनिव्हर्सलच्या जाहिरात विभागाच्या प्रमुख लिंडा याकारिनो यांना ट्विटरचे नवीन CEO बनवले जाऊ शकते. लिंडा यांनी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म पीकॉक सुरु करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. नुकत्याच एका कार्यक्रमात त्यांनी मस्क यांच्यासोबत हजेरी लावली होती.