जीएसटी नियमात बदल, जाणून घ्या काय आहे नवीन बदल.
जीएसटी कायद्यात बदल करण्यात आला असून आता 5 कोटी रूपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या कंपन्यांना बिझनेस-टू-बिझनेस व्यवहारांसाठी ई-इनव्हॉइस जारी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आधी 10 कोटी रूपयांपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या कंपन्यांना हे ई-इनव्हॉइस जारी करावे लागत होते. आता ही मर्यादा 5 कोटी रूपयांपर्यंत करण्यात आली. येत्या 1 ऑगस्ट पासून हा नियम लागू होईल.