‘खुपते तिथे गुप्ते’ सिझन २ मध्ये राज ठाकरे ?
‘खुपते तिथे गुप्ते’ हा शो 10 वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोच्या पहिल्या भागाला मोठी राजकीय व्यक्ती हजेरी दर्शवणार आहे. या नेत्याची चेहरा न दाखवता झलक सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत दाखवण्यात आली आहे. तसेच हा राजकीय नेता कोण?, असा प्रश्न विचारण्यात आला. हे व्यक्तीमत्त्व राज ठाकरे असून येत्या 4 जूनला या शोचा पहिला भाग झी मराठीवर प्रेक्षकांना पाहता येईल.