May 30, 2023
PC News24
गुन्हा

जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर प्राणघातक हल्ला.

जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर प्राणघातक हल्ला

तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशार आवारे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला.मारुती चौकातील नगरपरिषदेसमोर आवरे यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या नगरपरिषद कार्यालया समोर दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.
हल्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यु झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन खाली आले होते. त्यावेळी तिथेच दबा धरून बसलेल्या चार जणांनी त्यांच्यावर खूनी हल्ला चढवला. पैकी दोघाजणांनी गोळीबार केला. तर आणखी दोघांनी कोयत्याने वार केले. आवारे यांच्या डोक्यात गोळी लागली,आवारे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतरही काहीवेळ हल्लेखोर तिथेच थांबून होते. जखमी अवस्थेतील आवारे यांना सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच आवारेंचा मृत्यु झाला.आवारे यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुगणालयात नेण्यात आले आहे. किशोर आवारे यांच्या मातोश्री सुलोचना आवारे या तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माजी नगरध्यक्षा आहेत.

Related posts

विवाहितेला 150 उठाबशा काढण्याची अजब शिक्षा.

pcnews24

कंटेनर चालक कामगाराने स्वतःच्याच ऑफिसमध्ये केली चोरी.

pcnews24

गुन्हेगारांना पोलिसांचे भय राहिले नाही का? नागरिकांचा संतत्प सवाल. भर दिवसा पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची चोरी(विडिओ सह ).

pcnews24

मद्यप्राशन केलेल्या तरुणाची धावत्या बसवर दगडफेक.

pcnews24

दारू पिऊन कुटुंबाला मारहाणकरांना वडिलांचा खूप

pcnews24

“अनफिट” वाहनांना प्रवेश नाकारला,समृद्धी महामार्गाच्या अतिवेगावर आता करडी नजर.

pcnews24

Leave a Comment