पुण्याचा विद्यार्थी भारतात पाचव्या क्रमांकावर
CBSE ने आज दहावीचा निकाल जाहीर केला. या निकालात 10 वीच्या परीक्षेत 93.12% टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुणे विभाग या निकालाच्या उत्तीर्णतेच्या टक्केवारीत 96.92 टक्क्यांसह 5व्या स्थानावर आहे.
तर त्रिवेंद्रमने 99.91% उत्तीर्णतेसह अव्वलस्थान त्यापाठोपाठ बेंगळुरू (99.18%), चेन्नई (99.14%) व अजमेर (97.27%) यांचा क्रमांक आहे. तसेच गुवाहाटीमध्ये सर्वात कमी उत्तीर्णतेची टक्केवारी (76.90%) आहे.