शिष्यवृत्तीच्या विद्यार्थी संख्येत वाढ करण्याची मागणी-राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस
राज्याच्या समाज कल्याण विभागामार्फत व इतर बहुजन कल्याण विभागामार्फत राज्यात दर वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठीची या शिष्यवृत्तीची जाहिरात अजून पर्यंत आलेली नव्हती.सदर योजनेची अर्ज प्राप्त करून घेण्याची प्रक्रिया सुरु करावी व मागील वर्षी च्या तुलनेत यावर्षी शिष्यवृत्ती च्या विद्यार्थी संख्येमध्ये वाढ करून किमान ३०० विद्यार्थ्यांना हि शिष्यवृत्ती योजना लागू करावी. या मागणीसाठी 8 मे रोजी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस (शिष्यवृत्ती) श्री.सुयश राऊत यांच्या मार्फत राज्याचे समाज कल्याण आयुक्त, इतर बहुजन कल्याण विभागाचे संचालक व समाज कल्याण केंद्रीय राज्यमंत्री, मा. रामदास आठवले साहेब, यांना निवेदन देण्यात आले.
दिनांक १५ मे, २०२३ पासून या शिष्यवृत्ती ची प्रक्रिया सुरु करण्यात येईल असे आश्वासन यावेळी विभागामार्फत देण्यात आले आहे. या संदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा पाठपुरावा सुरू राहील. विद्यार्थी मित्रांना काही अडचणी आल्यास आम्हाला संपर्क करावा असे सांगण्यात आले .
हे निवेदन दिल्ली येथे यश साळुंखे यांच्यामार्फत आठवले साहेबांना तर पुणे शहर अध्यक्ष विक्रम जाधव यांच्या माध्यमातून राज्याचे समाज कल्याण आयुक्त व बहुजन कल्याण विभाग संचालक यांना सादर करण्यात आले. यावेळी अजय पवार, ऋषिकेश कडू, जय जगदीश कोंढाळकर, श्रीकांत बालघरे, कार्तिक थोपटे, पार्थ मिटकरी व पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, श्री.सुनिल गव्हाणे यांनी ही माहिती दिली.