December 11, 2023
PC News24
गुन्हाजिल्हाराजकारण

मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यासह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल किशोर आवारे हत्याप्रकरण

मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यासह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल किशोर आवारे हत्याप्रकरण

जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची शुक्रवारी (दि. 12) दुपारी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेसमोर निर्घृणपणे हत्या करण्यात आली. याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकर (रा. तळेगाव दाभाडे) आणि श्याम याचे तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी किशोर आवारे यांच्या आई, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.किशोर आवारे यांच्या हत्याप्रकरणी मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यासह सात जणांच्या विरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास किशोर आवारे नगरपरिषद कार्यालयात गेले असता तिथे श्याम निगडकर आणि त्याच्या तीन अनोळखी साथीदारांनी बंदुकीच्या गोळ्या झाडून व कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार करून त्यांना ठार मारले असल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.
किशोर आवारे हत्या प्रकरणात आरोपींनी पळवलेल्या दुचाकी सापडल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर आवारे हे जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून सामाजिक काम करत होते. जनसेवा विकास सेवा आघाडीच्या माध्यमातून ते तळेगाव येथे राजकारणात देखील सक्रीय होते. त्यामुळे त्यांचे राजकीय विरोधक असलेले आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे आणि त्यांच्या कार्यकर्ते यांच्यात वाद होत असत.
मागील सहा महिन्यांपासून किशोर आवारे यांनी आमदार शेळके, (Talegaon) त्यांचे भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचे त्यांच्या आईला सांगितले होते. 15 सप्टेंबर 2022 रोजी फिर्यादी यांच्या वाहन चालकाला तो फिर्यादी यांच्यासोबत असल्याने सुधाकर शेळके आणि त्यांच्या साथीदाराने जातीवाचक शिवीगाळ केली होती.किशोर आवारे हे त्यांचा मित्र संतोष शेळके यांच्यासोबत फिरत असल्याची बाब सुनील शेळके आणि त्यांच्या भावाला आवडत नसे. संतोष शेळके यांना किशोर आवारे सतत मदत करत असत म्हणून सुनील शेळके आवारे यांच्यावर चिडून असे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
किशोर आवारे यांनी मागील दोन वर्षांपासून स्वत:चा वेगळा गट तयार करून सुनील शेळके यांना राजकीय विरोध केला. चुकीच्या कामाबाबत वेळोवेळी निदर्शने केली. या रागातून तसेच त्यांचे राजकीय वर्चस्व वाढू लागल्याने आमदार शेळके यांच्या वर्चस्वाला धोका निर्माण झाला असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

*आमदार शेळके ‘नॉट रिचेबल’!*

याबाबत आमदार सुनील शेळके व त्यांचे बंधू सुधाकर शेळके यांचे मोबाईल फोन ‘नॉट रीचेबल’ आहेत. त्यांच्याशी संपर्क होताच त्यांची बाजू प्रसिद्ध करण्यात येईल.

Related posts

महानगरपालिका करण्यास उशीर केल्यास चाकण शहर होईल बकाल – राजेश अग्रवाल

pcnews24

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय बदलला.भाजपला धक्का.

pcnews24

चिटफंड भिशीमध्ये गुंतवणूकीत फसवणूक-16 लाख रुपयांचा अपहार.

pcnews24

पुणे:कोथरूडमध्ये अटक केलेल्या दहशतवाद्यांचे धागेदोरे रत्नागिरीपर्यंत; इंजिनीअर आरोपी अटकेत.

pcnews24

बृजभूषण सिंग राजीनाम्यास तयार,परंतु खेळाडूंनची अटकेची मागणी‌.

pcnews24

निगडी:तथाकथित भाईंची (कोयता गँग) पोलिसांकडून काढली धिंड.

pcnews24

Leave a Comment