दक्षिण भारतीय राज्यातून भाजप बाहेर !
दक्षिण भारतातील एकमेव कर्नाटक राज्यात भाजपची सत्ता होती. मात्र कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 65 जागा मिळवण्यात यशस्वी ठरलेल्या भाजपची येथील सत्ता गेली आहे. कर्नाटकात आता काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. तेलंगणामध्ये बीआरएस पक्षाचे नेते चंद्रशेखर राव यांची सत्ता आहे. तर आंध्र प्रदेशात वाएसआर पक्षाचे जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्री आहेत. तामिळनाडूत डीएमके आणि केरळमध्ये डाव्यांची सत्ता आहे.