जांभूळवाडी तलावात हजारो माशांचा मृत्यू
पुण्यातील आंबेगाव खुर्द येथील जांभूळवाडी तलावात हजारो माशांचा मृत्यू झाला आहे. या मृत माशांचा खच किनाऱ्यावर साठला होता. छोट्या मासोळ्यांपासून ते तब्बल पंधरा-वीस किलो वजनाचे चार-साडेचार फुट लांबीचे मोठे मासे मरून पडले होते. तलावाच्या काठावर 8 दहा फुटांपर्यंत अनेक मृत मासे पाण्यावर तरंगलेले दिसले. इतक्या मोठ्या प्रमाणात मासे कशामुळे मेली याचा शोध पाटबंधारे विभाग घेत आहे.