June 1, 2023
PC News24
ठळक बातम्या

अखेर सुनील अण्णा शेळके यांनी दिली प्रतिक्रिया

अखेर सुनील अण्णा शेळके यांनी दिली प्रतिक्रिया

किशोर आवारे हत्या प्रकरणात जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येप्रकरणा मध्ये अखेर सुनील (Maval) शेळके यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.आमदार सुनील शेळके आणि त्यांच्या भावाचे नाव आले त्याबाबत आमदार शेळके यांनी शनिवारी (दि. 13) पत्रकार परिषद घेत त्यांची बाजू मांडली. कालच्या घटनेमध्ये संध्याकाळी जी फिर्याद नोंद करण्यात आली त्यामध्ये माझं स्वतः सुनील शेळके, माझा भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे आणि इतर काही अशा व्यक्तींकडून हत्येचा कट करण्यात आला त्यामध्ये सांगण्यात आलं.परंतु ही फिर्याद देत असताना शेवटी एखाद्या कुटुंबातला व्यक्ती गेल्यावर त्या परिवाराची भावना देखील तीव्र असते, हे आम्ही समजू शकतो. परंतु त्या मागचे खरे सूत्रधार कोण आहेत. कोण हे सगळं घडवत आहे कोण जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न करतो हे देखील आम्ही पुढील काळामध्ये शोध घेऊन तो नक्कीच जनतेपुढे आणल्याशिवाय राहणार नाही.त्यामुळे अशा घटनेला राजकीय वळण देऊ नका. जी सत्यता असेल त्याला न्याय देण्याचे काम पोलीस आणि न्याय यंत्रणा करेल, असा विश्वास आमदार शेळके यांनी व्यक्त केला.
आमदार सुनील शेळके म्हणाले, काल दुपारी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांची नगरपालिकेच्या आवारामध्ये दुपारी हत्या करण्यात आली. या हत्येचा, घटनेचा जाहीर तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त करतो. कालची घटना झाली त्या घटनेनंतर आज सकाळी सात वाजता सुनील शेळके नॉट रीचेबल, फोन स्विच ऑफ अशा पद्धतीने माध्यमाने ज्या काही बातम्या लावण्याचे काम केलं त्या अनुषंगाने आत्ता मी पत्रकार परिषद या ठिकाणी घेत आहे.

कालची जी काही घटना झाली या घटनेमध्ये कोण आरोपी आहेत. ही घटना का केली, यामागची सत्यता काय आहे, त्या गुन्हेगारांची पार्श्वभूमी काय आहे? ते कोण गुन्हेगार आहेत याची सखोल चौकशी पोलीस खात्यातील सर्व अधिकारी प्रामाणिकपणे करण्याचं काम करत आहेत.
परंतु, जी काही घटना घडली या मावळ तालुक्याला वेगळा पायंडा पाडण्याचं काम राजकारणाच्या माध्यमातून किंवा समाजकारणाच्या माध्यमातून कुणी करू नये. याच करता आम्ही सातत्याने देखील समंजसपणाची भूमिका घेऊन काम करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहोत.
सामाजिक जीवनामध्ये, व्यावसायिक जीवनामध्ये काम केलं. माझ्या राजकीय जीवनात कधी साधी कोणाच्या तोंडात थप्पड मारली किंवा कुणाला शिवी दिली असा कुठेही गुन्हा नाही. अशा प्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर जशास तसे उत्तर देईल. मी कायद्याने चालणारा माणूस आहे. मला खाकी वर्दीचे संरक्षण आहे. मी अशा फडतूस गुन्हेगारांकडे का लक्ष देऊ. कुणीही कुणाच्या जीवावर उठेल पण सुनील शेळके अशा घाणेरड्या प्रवृत्तीकडे कधीच जाणार नाही.
मागील काही दिवसापूर्वी किशोर आवारे असतील किंवा आम्ही असू राजकारणामध्ये एकत्रितपणे काम केलं. परंतु, आमचे विचार मतभेद असतील परंतु मनभेद नव्हते. काही मंडळी यामध्ये जाणीवपूर्वक राजकारण करण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर कृपया करून अशा घटनेला राजकीय वळण देऊ नका.
घटनेची सत्यता समाजापुढे न्याय देवता आणि पोलीस यंत्रणा आणल्याशिवाय राहणार नाही.
मला एवढे सांगायचे की माझ्या मायबाप जनतेने या सुनील शेळकेला आयत्या वेळेला पक्षांमध्ये येऊन सुद्धा 94 हजार मताने निवडून दिले. ते कुणाच्या जीवावर उठायला, कुणाला लुटमार करायला, कुणाला फसवायला निवडून दिले नाही. राजकारण करत असताना आपण विकासाचा राजकारण केले पाहिजे. आपण आरोप प्रत्यारोप करत असतो तरी ते तात्पुरते असले पाहिजेत.
राजकारणापासून अलिप्त व्हायचं असेल तर आज होईल परंतु बदनाम करून जर कोणी मला अलिप्त करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते मी कदापी सहन करणार नाही. चौकशी सखोल करा याच्यातून कोण गुन्हेगार आहेत यांची देखील चौकशी करा आणि यामागे कोण राजकारण करतोय यांची देखील आपण चौकशी केली पाहिजे.
या घटनेची माहिती मी स्वतः उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार आहे, असेही आमदार शेळके यांनी सांगितले.

Related posts

IPL 2023: विराट कोहलीचा बंगळुरू संघ विजेतेपदाचा दुष्काळ संपवणार का? ‘या’ खेळाडूंवर असेल मदार

Admin

Nashik : शाळा आवारात विद्यार्थ्यांचं भांडण, शिक्षकाकडून विद्यार्थ्यास मारहाण, नाशिकमधील घटना

Admin

Thane : ठाण्यातील काही भागात पाणी कपात!

Admin

“हेवन जिम्नास्टीक अकादमीच्या सृष्टीने पुन्हा राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले सुवर्ण पदक”

pcnews24

Tharla Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेने गाठला 100 भागांचा टप्पा

Admin

शेअर बाजारातील व्यवहार तेजीसह बंद; ‘या’ स्टॉक्सने बाजार सावरला

Admin

Leave a Comment