शहरात मृत झालेल्या जनावरांचे पुणे महापालिकेच्या नायडू पॉण्ड येथे दफन होणार
पिंपरी-चिंचवड शहरात मोठे जनावर मृत झाल्यास त्याचे दहन करण्याचे काम पालिकेने पुण्यातील दिल्लीवाला ऍण्ड सन्स या एजन्सीला दिले आहे.
यापूर्वी या मोठ्या मृत जनावरांचे दफन एमआयडीसी, भोसरी येथील प्लॉट क्रमांक 56 या जागेत करण्यात येत होते. ती जागा पालिकेकडून एम.आय.डी.सी कडे हस्तांतरीत करण्यात आल्याने तेथे जनावरांचे दफन करणे बंद करण्यात आले आहे. सध्या शहरात मृत झालेल्या जनावरांचे पुणे महापालिकेच्या नायडू पॉण्ड येथे दफन केले जात आहे. त्याची वर्क ऑर्डर 30 एप्रिल 2020 ला त्या एजन्सीला देण्यात आली आहे. कामाची मुदत 1 मे 2020 ते 30 एप्रिल 2023 अशी तीन वर्षे आहे. त्यासाठी एकूण 1 कोटी 13 लाख 94 हजार खर्च पालिकेने संबंधित एजन्सीला अदा केले आहेत.
मृत पावलेल्या गाय, बैल, म्हैस, शेळी, मेढी, घोडा व गाढव या (Pimpri News) मोठ्या जनावरांना पुणे महापालिकेच्या नायडू पॉण्ड येथील विद्युत दाहिनीत दहन केले जाते. त्यासाठी प्रती मृत जनावरासाठी 3 हजार रुपये पुणे महापालिकेस आणि वाहतूक खर्चासाठी प्रत्येक फेरीस 553 रुपये असा अतिरिक्त खर्च संबंधित ठेकेदाराला देण्यात येणार आहे. या ठेकेदाराला कामासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.त्यासाठी पुणे पालिकेस एका मृत जनावरासाठी 3 हजार रुपये महापालिका देत आहे. तेथे मृत जनावरांचे 3 नोव्हेंबर 2022 पासून दिली आहे. दफन केले जात आहे. आतापर्यंत दहन केलेल्या मृत जनावरांचे एकूण 2 लाख 31 हजार 753 रुपये आणि नायडू पॉण्ड येथे जाण्यासाठी प्रतिफेरी वाहनखर्च 553 रुपये आहे. तो अतिरिक्त खर्च संबंधित एजन्सीला अदा करण्यात येणार आहे.
दरम्यान, या कामाची मुदत संपल्याने पशुवैद्यकीय विभागा कडून नव्याने निविदा राबविण्यात येत आहे. तोपर्यंत संबंधित एजन्सीला 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार दरमहा 4 लाख 3 हजार 873 खर्च अपेक्षित आहे. मुदतवाढ देण्यास व येणाऱ्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.