वडलांना मारल्याच्या रागातून केली निर्घृण हत्या
पुण्यात 2 दिवसांपूर्वी तळेगावमध्ये जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आरोपींनी धक्कादायक खुलासा केला आहे. नगरपरिषदेचे माजी नगरसेवक भानू खळदे यांच्यात व आवारे यांच्यात झालेल्या वादातून आवारेंनी खळदेंना कानाखाली मारली होती. त्याचा राग मनात धरुन खळदेंचा मुलगा गौरव खळदेने ही हत्या घडवून आणल्याचे तपासात समोर आलेले आहे. पोलिसांनी गौरव खळदेला अटक केली आहे.