डॉ. राम ताकवलेंचे निधन
पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले यांचे 90 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी 1957 साली पुणे विद्यापीठातून एम. एस्सी पदवी घेतली होती. तसेच त्यानंतर त्यांनी संशोधन पदवी मास्को स्टेट विद्यापीठामधून मिळवली. त्यांनी 1988 ते 1989 या कालावधीत पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कामकाज पाहिले. त्यांच्याच प्रयत्नांतून 1989 मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली.