गौतमी ताई महाराष्ट्राचे बिहार करू नका
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी जमते. त्यातच आता यावर छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध असलेला बाल कलाकार धनश्याम दरोडे याने प्रतिक्रिया दिली आहे. ‘गौतमी ताईंना कळकळीची विनंती आहे की तुम्ही महाराष्ट्राची संस्कृती मोडू नका. लावणीला लावणी सारखं राहू द्या. तुम्ही तुमच्या प्रमोशनसाठी कुठल्याही अश्लीलतेचा वापर करू नका. तुम्ही महाराष्ट्राची वाटचाल बिहार कडे करत आहे, असे तो म्हणाला.