कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा अंतिम निर्णय खरगेंनाच्या हातीच.
कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री पदावर कोणाची नियुक्ती करावी, यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या सर्व सदस्यांनी एकमताने मुख्यमंत्री पदाचा निर्णय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर सोपवला आहे. आता अंतिम निर्णय खरगे यांना घ्यावा लागणार आहे. डी. के. शिवकुमार किंवा सिध्दारमैय्या यांपैकी एकाला मुख्यमंत्री पद मिळू शकते.