उद्या सिंहगड किल्लावर प्रवेश बंद!!
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खडकवासला धरण चौपाटी आणि सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. उद्या (15 मे) दुपारी 2.00 वाजेपर्यंत ही दोन्ही ठिकाणे पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहेत. दरम्यान, राजनाथ सिंह खडकवासला धरणाला लागून असलेल्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीला भेट देणार आहेत.