लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र लढवणार महाविकास आघाडी – जयंत पाटील.
महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक शरद पवार यांच्या निवासस्थानी पार पडली. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीतील पक्ष एकत्रितपणे लढणार आहे, असे जयंत पाटील यांनी बैठकीनंतर म्हटले आहे. महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये येत्या काही दिवसांत जागावाटप होणार आहे. बैठकीत कर्नाटक विधानसभा तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर चर्चा झाली. पुढची वज्रमुठ सभा पुण्यात होणार असल्याचे नाना पटोले म्हणाले.