मावळा युवा क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानची राज्य कार्यकारिणी जाहीर – धर्मवीर संभाजी महाराज जयंतीचे औचित्य
धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत 14 मे 2023 रोजी मावळा युवा क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान या संघटनेची कार्यकारिणी पुर्वाध्यक्ष श्री. दत्ता धडे यांनी सर्वसाधरण वार्षिक सभेत जाहीर केला याच सभेतपुढील पाच वर्षासाठीच्या कार्यकारिणीची निवड एकमताने करण्यात आली. यामध्ये श्री. हनमंत कदम (अध्यक्ष) तर श्री दत्ता धडे व सौ. उज्वला कोडे (उपाध्यक्ष) श्री. विनायक माने (सचिव) श्री. महेश सिंहासने (कार्याध्यक्ष) श्री.गणेश सागर (कोषाध्यक्ष) श्री. अभिजीत नांदगावकर (सहसचिव) सौ.मृदुला कुलकर्णी(सहकार्याध्यक्ष)
श्री नरहरी होनप (सहकोषप्रमुख) तसेच सौ लक्ष्मी घडे (योगाप्रमुख) श्री ओंकार कबुले (मल्लखांब)
श्री गौरव होनावळे, श्री. अभिजीत बिन्हामणे, सौ. गिरीजा शिंदे, सौ. विजया बोरसे (नाशिक भाग प्रमुख)अशी कार्यकारिणीची रचना असून या सर्वांचा सत्कार प्रमुख अतिथी श्री. अरविंद साठे (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते) यांच्या शुभहस्ते करण्यात आला.या सभेचे प्रास्ताविक श्री विनायक माने यांनी केले यात पुढील वर्षभरातील कार्यक्रमाचे नियोजन तसेच संघटनेचे ध्येयधोरण काय राहील हे मांडताना ‘कला हे समाजात आनंद निर्माण करण्याचे तर क्रीडा हे सशक्त निरोगी समाज निर्माण करण्याचे माध्यम असून मात्र त्याकरिता
चांगले पर्यावरण आपल्या प्रयत्नातून जर निर्माण करू शकलो तर आनंदी जीवनाचा लाभ मानवी
घेता येईल, ही दृष्टी ठेवून काम करू व तशा कार्यक्रमांची रचना करूयात असे प्रतिपादन केले.
तसेच पुर्वाध्यक्ष श्री.दत्ता धडे यांनी अध्यक्षपदाची संधी मिळाली व गेल्या पाच वर्षात केलेल्या उपक्रमांची नोंद घेतली. तर नुतन अध्यक्ष श्री हनुमंत कदम यांनी मनोगत व्यक्त करताना पुढील काळात संस्थेस पुढे नेताना वैशिष्ठ्यपुर्ण उपक्रमांची रचना करूयात असे प्रतिपादन केले.. सर्वाना मार्गदर्शन करताना श्री अरविद साठे यांनी संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक केले तसेच
युवकांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी करत असलेल्या कामाचे विशेष कौतुक करताना छ.शिवाजी महाराजांच्या चरित्रातून स्वराज्यासाठी जगायचे कसे तर धर्मवीर छ. संभाजी महाराजांच्या चरित्रातून स्वराज्यासाठी बलिदान कसे करावे हे शिकण्यासारखे आहे, असे गौरवोद्गार काढले. सौ. उज्वला कोंडे यांनी सर्वांचे आभार मानले.