काँग्रेस मध्ये शिवकुमार व सिध्दारमैय्या समर्थकांची घोषणाबाजी, मुख्यमंत्री पदावरून दावेदारी !
बंगळुरु येथे कर्नाटक काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री पदाबाबत कोणताही निर्णय झाला नाही. बैठकीनंतर डी. के. शिवकुमार व सिध्दारमैय्या यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दोन्ही नेत्यांचे समर्थक जोरदार घोषणाबाजी करत आपल्या नेत्यालाच मुख्यमंत्री बनवण्याची मागणी करत आहेत. डी. के. शिवकुमार विरुध्द सिध्दारमैय्या असे वातावरण काँग्रेसच्या गोटात निर्माण झाले आहे.